कोरोना अपडेट : खेड तालुका, तालुक्यात ३६ नवीन कोरोना रुग्णांची वाढ
एकूण रुग्णांची संख्या १८३५, आळंदीत सर्वाधिक ८ रुग्ण, ग्रामीण भागात २० रुग्णांची वाढ,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ३६ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात २० रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १८३५ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १६ ) : राजगुरूनगर – २, चाकण – ६, आळंदी – ८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २० ) : सोळू ३, खराबवाडी २, धानोरे २, तर जऊळके बुद्रुक, निमगाव, कन्हेरसर, कडुस, चांदूस, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, महाळुंगे, चिंबळी, भोसे, दौंडकरवाडी, मोई व होलेवाडी या १३ गावात प्रत्येकी १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३६
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १८३५
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ४७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३२८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १४६०
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : आळंदी – ८, चाकण ६.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : शून्य