Wednesday, April 16, 2025
Latest:
नागरी समस्यापिंपरी चिचंवडपुणेपुणे जिल्हाप्रादेशिकविशेष

तळवडेतील वाहतूक समस्या न सोडविल्यास रास्ता रोको करून तळवडे ते चाकण एमआयडीसीला जाणारा ब्रिज बंद करण्याचाग्रामस्थांचा पोलीस प्रशासनाला इशारा

तळवडेतील वाहतूक समस्या सोडविल्यास रास्ता रोको करून तळवडे ते चाकण एमआयडीसीला जाणारा ब्रिज बंद करण्याचा ग्रामस्थांचा पोलीस प्रशासनाला इशारा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर

पिंपरी : तळवडे परिसरातील वाहतूक समस्या होणारे अपघात या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी तळवडे ग्रामस्थांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेऊन समस्या संदर्भात निवेदन दिले. पोलीस आयुक्तांनी तळवडेतील वाहतूकसमस्या १५ दिवसांत सोडविल्यास तळवडे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी संबंधित विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

तळवडे चौकात शनिवारी (दि. ) दुपारी दोन वाजता वृषाली बाजीराव भालेकर यांचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना वाहतूकविभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे घडली आहे. त्यामुळे तळवडे ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे.

तळवडे ग्रामस्थांच्या वतीने पिंपरीचिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भालेकर यांचा अपघात घडला त्या दिवशी आळंदी यात्रा होती. त्यावेळी तळवडे चौकात एकही वाहतूक नियंत्रक पोलीस उपस्थित नव्हता. या घटनेनंतर देहूरोड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गजेवार आले. त्यांनी संबंधित मयताचे नातेवाईक ग्रामस्थ महिलांनाधमकावले. तसेच तुमच्यावर गुन्हे दाखल करू करिअर बरबाद करू आणि उपस्थित महिलांसोबत असभ्य भाषेत वर्तन केले. याघटनेच्या निषेधार्थ संबंधित पोलीस कॉन्स्टेबल गजेवार यांची त्वरित बदली करावी. तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी अधिकारीकोणीही हजर नव्हते त्यांच्यावर कारवाई करावी.

तळवडे कॅनबे चौक ते त्रिवेणीनगर या रोडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या मार्गावर सकाळी ते रात्री पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालावी. अन्यथा तळवडे हद्दीतील चाकण एमआयडीसीला जाणारा ब्रिज बंद करण्यात येईल. निगडी तळवडे मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्धबद्ध करून द्यावा. तळवडे चौक, त्रिवेणीनगर चौक येथे नियमित वाहतूक नियमन करणारे पोलीस नियुक्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पोलीस आयुक्तांना निवेदन देताना माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनवणे, शरद भालेकर, विनायक पिंजण, अनिल भालेकर, तुकाराम भालेकर, प्रवीण पिंजण, शरद गोपाळ भालेकर, अशोक भालेकर, रमेश बाठे, बाजीराव भालेकर, दीपक बोर्डे, भरत कामठे, बाळासाहेब नखाते उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!