युवा शेतकरी रामकृष्ण पवळे यांचे अपघाती निधन
युवा शेतकरी रामकृष्ण पवळे यांचे अपघाती निधन
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : रेटवडी ( ता. खेड ) येथील गुलाब उत्पादक शेतकरी रामकृष्ण सखाराम पवळे ( वय ४२ वर्षे ) यांचे आज ( दि. १ डिसेंबर ) अपघाती निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शनिवारी सकाळी ९ वाजता रेटवडी येथे होणार आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना… रामकृष्णला भावपूर्ण श्रद्धांजली…
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. इलेक्ट्रिकल व्यावसायिक राजेंद्र पवळे यांचे ते धाकटे बंधू, मांजरवाडीधर्म येथील शेतकरी गणेश मांजरे यांचे ते भाचे, तर सांगुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल काळे यांचे ते मेव्हुणे होत.
रामकृष्ण हे अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाचे होते. अगदी लहान वयात त्यांनी ग्रीन हाऊसमध्ये ऑर्किड, जरबेरा, गुलाब फुलांचेउत्पादन सुरु केले होते. पवळे यांच्या निधनामुळे रेटवडी गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.
0000