BIG BREAKING : महाळुंगे इंगळे गावात तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून, या सहा जणांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार
BIG BREAKING : महाळुंगे इंगळे गावात युवकाचा कोयत्याने निर्घृण खून, या सहा जणांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार
महाळुंगे इंगळे : चाकण औद्योगिक वसाहतीतील महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) गावात एका ३१ वर्षीय युवकाचा कोयत्याने वार करूननिर्घृन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर आरोपीफरार झाले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची पोलीस पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना आज ( दि. २६ ) दुपारी साडेबाराच्या सुमारास रेणुका हॉटेल ते ग्रामपंचायतकडे जाणाऱ्यारोडवर प्रतीक गॅस रिपेअरिंग या दुकानात घडली. पूर्वी झालेल्या शिवीगाळीच्या कारणावरून आरोपींनी रितेश संजय पवार (वय ३१ वर्षे, रा. महाळुंगे इंगळे ) या युवकाच्या डोक्यात लाकडी दांडके व कोयत्याने वार करून निर्घृण खून केला.
याप्रकरणी शंभू भोसले, अभि जावळे, वैभव आंधळे, विनोद बटलवार, शेखर नाटक व छोटा साकेत या सहा जणांवर खुनाचा गुन्हादाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संदेश बापूराव भोसले ( वय २१ वर्षे, रा. द्वारका सिटी, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रितेशचे मागील सहा महिन्यापूर्वी लग्न झाले असून त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. वरिष्ठ पोलीसनिरीक्षक वसंत बाबर व गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.