Thursday, April 17, 2025
Latest:
खेडग्रंथालयपश्चिम महाराष्ट्रपिंपरी चिचंवडपुणे जिल्हापुणे शहर विभागप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन २० व २१ फेब्रुवारी २०२४ ला आळंदीत होणार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची सभा उत्साहात संपन्न

राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन २० २१ फेब्रुवारी २०२४ ला आळंदीत होणार
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची सभा उत्साहात संपन्न

महाबुलेटीन न्यूज l अर्जुन मेदनकर

आळंदी देवाची ( पुणे ) : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची सभा श्रीक्षेत्र आळंदी येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था येथे संपन्नझाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे होते. या वेळी विविध विषयांवर चर्चाकरण्यात आली. मुख्यत्वेकरून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन आळंदी येथे दिनांक २० २१ फेब्रुवारी २०२४रोजी घेण्याचे ठरले. कार्यकारी मंडळाची सभा नियामक मंडळाची १९ फेब्रुवारी २०२४ ला सायंकाळी वाजता घेण्याचे ठरले.

हनुमंत देवकर यांचा वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट देऊन सत्कार करताना डॉ. गजानन कोटेवार व पदाधिकारी यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल सोनवणे, पुणे विभागाचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे विभागाचे प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, सहकार्यवाह राजेंद्र ढमाले पुणे, मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, नागपूर विभागाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हभप. मोहन महाराज शिंदे, उपाध्यक्ष हनुमंत देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मोहन महाराज शिंदे यांनी अधिवेशनाच्या नियोजन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. आलेल्या मान्यवरांचे ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रसाद भेट देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालयाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर यांना वाढदिवसानिमित्त ग्रंथ भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पुणे विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष अरुण दांगट, मधुकर सुतार, पांडुरंग सुर्यवंशी, दिलीप कोरे, प्रकाश पाटील, हनुमंत देवकर, भिमराव पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्तकेले.

यावेळी उपाध्यक्ष मार्केंडेय मिठापल्ली, संजय बोंदाडे, विलास चोंधे, राजगोंडा पाटील, संतोष गोफणे तसेच राज्य कार्यकारीणी संचालक मंडळ, पुणे विभाग पुणेजिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोपानराव पवार यांनी प्रास्ताविक केले, तर विजय कोलते यांनी आभार मानले.                 0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!