जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पुणे येथील एनडीआरएफ मध्ये रक्तदान शिबीर संपन्न, 40 रक्तदात्यांनी केले रक्तदान
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पुणे येथील एनडीआरएफ मध्ये रक्तदान शिबीर संपन्न, 40 रक्तदात्यांनी केले रक्तदान
महाबुलेटीन न्यूज I प्रसन्नकुमार देवकर
पुणे : गुजरातमधील बिपरजॉय चक्रीवादळामुळे 5 व्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ( एनडीआरएफ ) ची 10 पथके तैनात असूनही जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सुदुंबरे, पुणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात मीरा भाईंदर महानगरपालिका, भारतरत्न राजीव गांधी रक्तपेढी, पुणे द्वारा रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन जागतिक रक्तदाता दिन यशस्वी केला. यामध्ये 01 राजपत्रित अधिकारी, 35 कर्मचारी आणि 5 व्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 04 महिला अशा एकूण 40 कर्मचाऱ्यांनी सक्रियपणे रक्तदान केले. तसेच सहभागी होऊन रक्तदान शिबिर यशस्वी केले.
0000