Thursday, April 17, 2025
Latest:
खेडदिन विशेषपिंपरी चिचंवडपुणे जिल्हाप्रादेशिकविधायकविशेषसामाजिक

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चाकण वनविभागाच्या आळंदी रोडवरील मेदनकरवाडी हद्दीत ५ हजार देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण सप्ताह साजरा, वृक्ष संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चाकण वनविभागाच्या आळंदी रोडवरील मेदनकरवाडी हद्दीत हजार देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण सप्ताह साजरा, वृक्ष संवर्धनाची घेतली प्रतिज्ञा.              

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर

चाकण : चाकण वनविभाग, पर्यावरण जागर प्रतिष्ठान, चाकण डॉक्टर्स असोशिएशन, चाकण फॉरेस्ट रेस्क्यू टीम, बॉश कंपनी विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चाकण वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली आळंदी रोड वरील वनविभागाच्या माझगाव फाट्यावरील मेदनकरवाडी हद्दीत वड, पिंपळ, आंबा, चिंच, कवठ, कडुनिंब, बेल, करंज आदी विविध प्रकारच्या हजार देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा केला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येथे ७५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

प्रथमतः संत साहित्याच्या प्रचारक कीर्तनकार साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी, पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण मांजरे, प्रवक्ते हनुमंत देवकर यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे पूजन करून वृक्षारोपणास प्रारंभ करण्यात आला.

दरवर्षी जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू ठेवुन चाकण वनविभागाने आळंदी रस्त्यावरील मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील वनविभाग परिसरात जूनपासून वृक्ष लागवडीस सुरुवात केली. हा वृक्ष लागवड कार्यक्रम १३ जूनपर्यंत संपूर्ण सप्ताहात चालू राहणार आहे.

येथील वनहद्दीत वनकर्मचायांनी सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी हि झाडे जगविण्याचा संकल्प केला. याबाबत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे सचिव राजन जांभळे यांनी सर्वांना प्रतिज्ञा दिली.

सध्या वातावरणातील बदल हे विचित्र पद्धतीने जाणवत असताना आपण पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचीगरज असल्याचे चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी यावेळी सांगितले.

वनविभागाच्या हद्दीत ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणे असतील ती काढण्याची मागणी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरणशेठ मांजरे यांनी करून सर्व पर्यावरण प्रेमींच्या वतीने यासाठी पाठिंबा दिला.

यावेळी चाकण डॉक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल बेनके, बॉश कंपनीचे प्लांट हेड विनोद व्यंकटेश, सुरक्षा विभागाचे प्रमुख अपू शहा, एचसीएम हेड मुकुंद कराडखेडकर, एचआर हेड रावलनाथ पाटील, सीएसआर कोओर्डीनेटर सूरज जाधव, रेस्क्यू टीमचे बापूसाहेब सोनवणे, वसुंधरा संस्थेचे अतुल सवाखंडे, राजेंद्र जगनाडे, सर्व वनपाल, वनरक्षक सर्व वनमजुर तसेच बॉश कंपनीचे कामगार कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी झाडेझुडपे, जंगल, जीवजंतू, पाणी या सगळ्यांचे संरक्षण करण्याचाआपण प्रयत्न केला पाहीजे. प्रत्येकाने लहानमोठ्या कामातून पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने पावले उचलायला हवीत. आयुष्यात प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि ते वाढवावे, असा संदेश वन विभागाकडुन देण्यात आला.

आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी घराच्या अंगणात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर संपूर्ण बागच फुलवलेली आहे. अशी सुरुवात प्रत्येकाने आप आपल्या घरापासून केली तर पर्यावरण संतुलन राखण्यास खऱ्या अर्थाने मदत होईल. लोकसंख्येचा विचार करता दररोज हजारो लोक केक कापून वाढदिवस साजरा करताना दिसतात, जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त फळे कापून वाढदिवस साजरा केला, तसेच वाढदिवसानिमित्त झाड भेट देऊन एक झाड लावले, तर वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड होऊ शकते, असे प्रतिपादन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे प्रवक्ते हनुमंत देवकर यांनी केले.

जागतिक पर्यावरणाची सुरुवात :- पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. त्यामुळे १९६० पासून पर्यावरण हा विषय स्वतंत्र्यरित्या अभ्यासाठी येऊ लागला. बदलत्या हवामानाचे परिणाम हळूहळू जगाला जाणवू लागले होते. भविष्यात याचे गंभीर परिणाम मानव जातीला भेडसावू लागतील, फक्त मनुष्यजीवांवरच नाही तर पशूपक्षी सगळ्यांनाच याचे परिणाम भोगावे लागतील याची जाणीव सगळ्यांना होऊ लागली म्हणूनच पर्यावरण संरक्षणासाठी जून १९७२ या दिवशी स्टॉकहोम येथे बदलत्या वातावरणाची दखल घेत काही देशांची मंडळी एकत्र जमली. बदलते हवामान आणि पर्यावरण याची दखल घेण्यासाठी जून या दिवशी सुरुवात झाली.

==================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!