खेडसण-उत्सव

श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त खेड तालुक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : आज ( दि. ५ ऑगस्ट ) आयोद्धेत श्रीराम मंदिराचा भुमिपुजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला असताना खेड तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य व भाजपचे खेड तालुकाध्यक्ष अतुल देशमुख यांनी सपत्नीक घरासमोर गुढी उभारुन आजचा आनंदाचा दिवस साजरा केला. चाकण शहरात शिवसेनेचे उपविभाग प्रमुख स्वामी कानपिळे व सेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मनोज पांडे, हर्षल कापसे, सुनील गाडे, विशाल कापरे, मंगलसिंग रावना, राहुल पांचाळ, विशाल म्हस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!