कोरोनापुणे जिल्हाविशेष

पुणे विभागात कोरोना रुग्णांचा आकडा दीड लाखांवर : सौरभ राव  

पुणे विभागात कोरोना रुग्णांचा आकडा दीड लाखांवर : सौरभ राव
महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
पुणे : पुणे विभागातील 1 लाख 4 हजार 250कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 50 हजार 745 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 594  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  3 हजार 901 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  69.16 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण  1 लाख 15 हजार 128  रुग्णांपैकी  86 हजार 817  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 692 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.27 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.41 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 6  हजार 225 रुग्णांपैकी   2 हजार  893  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3 हजार  135 आहे. कोरोनाबाधित एकूण  197 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  12 हजार 51 रुग्णांपैकी  7 हजार  858 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 615 आहे. कोरोनाबाधित एकूण 578  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 सांगली जिल्हा
 सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 5  हजार 83 रुग्णांपैकी  1 हजार 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3  हजार  225  आहे. कोरोनाबाधित एकूण 166 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 12  हजार  258 रुग्णांपैकी  4 हजार 990 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6  हजार 927  आहे. कोरोनाबाधित एकूण  341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे .
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ 
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4  हजार   405 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात  2 हजार 997  , सातारा जिल्ह्यात 286, सोलापूर जिल्ह्यात 404, सांगली जिल्ह्यात 181  तर कोल्हापूर जिल्ह्यात  537 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 42 हजार 25  नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 50  हजार 745  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!