काव्यमंच : आता आठवणे हाती
🐂आता आठवणे हाती🐂
———————————–
काम गेले यंत्रावर
बघ तुझे बा रे बैला
आता आठवणे हाती
काळ तुझा तोच पैला ॥धृ॥
जय किसान चा स्वर
तेंव्हा होता निनादला
धन धान्य समृध्दीने
देश होता माझा भला॥१॥
देश सुजल सफल
राष्ट्र गीतात उरला
शेती पासून बळीही
दुरावत हा चालला॥२॥
कधी ओला कधी सुका
काळ दुष्काळाचा आला
बघ यंत्राने मानव
बळी गेला आळसाला॥३॥
जाऊ नये आळस हा
बघ बैला कळसाला
म्हणूनच आठवला
काळ मला तुझा पैला॥४॥
— निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
🐂🐂 🐂🐂🐂🐂 🐂🐂