निधन वार्ता : परशुराम खराबी
निधन वार्ता : परशुराम खराबी
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील शेतकरी परशुराम विष्णु खराबी ( वय १०३ वर्षे ) यांचे रविवारी ( दि. १६ ऑगस्ट ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे एक मुलगा, तीन मुली, भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. पीडीसीसी बँकेचे निवृत्त कर्मचारी विश्वनाथ खराबी यांचे ते वडील, तर हॉटेल अथर्वचे मालक, उद्योजक संतोष खराबी यांचे ते आजोबा होत.
——-