इंदापूर तालुकयात नवे एकोणीस कोरोरुग्ण
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : उपजिल्हा शासकीय रुग्णालयाने घेतलेल्या रॅपीड फास्ट टेस्टनंतर एकोणीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यामध्ये इंदापूर शहरातील सतरा तर भिगवण मधील दोघा जणांचा समावेश आहे, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
रॅपीड फास्ट टेस्टअंतर्गत पंचवीस जणांच्या घश्यातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी एकोणीस जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले, असे डॉ. चंदनशिवे यांनी स्पष्ट केले.