चाकण मधून सात रुग्णांची कोरोनावर मात
महाबुलेटिन नेटवर्क (कल्पेश भोई)
चाकण : येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कोविड -19 चे सात रुग्ण आज क्रिटिकेयर हॉस्पिटल मधून कोरोना मुक्त करून सोडण्यात आले. क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णतः स्वतंत्र वेगळा प्रभाग तयार करण्यात आला असून कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी सर्व सोयी- सुविधासह स्वतंत्र टीम कार्यरत आहे. चाकण क्रिटिकेअरचे संचालक डॉ. राजेश घाटकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लागण झालेले सुमारे 23 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते, त्यापैकी सर्वच रुग्ण तीन टप्प्यात या हॉस्पिटलमधून कोरोना मुक्त होऊन आपापल्या घरी सोडण्यात आले आहेत, कोरोनावर मात करता येते त्यासाठी नागरिकांनी शासनाने सांगितल्याप्रमाणे योग्य खबरदारी घ्यावी. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.