सामाजिक कार्यकर्त्या आशा भट्ट यांना पितृशोक ● चंद्रवल्लभ भट्ट यांचे निधन
सामाजिक कार्यकर्त्या आशा भट्ट यांना पितृशोक
● चंद्रवल्लभ भट्ट यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्त्या आशा भट्ट यांचे वडील श्री. चंद्रवल्लभ भट्ट ( वय – ६६ ) यांचे मंगळवारी ( दि. ११ मे ) कोरोनाशी झुंज देत YCM हॉस्पिटल मध्ये निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी माधवी भट्ट, थोरली मुलगी आशा भट्ट, मुलगा सूरज भट्ट, सून, धाकटी मुलगी सपना भट्ट, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कोविड वॉर्ड मध्ये मोठी मुलगी व परिवार हॉस्पिटल मध्ये दिवस रात्र प्रयत्न करीत होते, मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भट्ट यांनी सांगवी येथे पारंपरिक पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.