कोरोना अपडेट : खेड तालुका तालुक्यात २४ तासात ५५ नवीन कोरोना रुग्णांची वाढ
एकूण रुग्णांची संख्या १९४६, चाकण व आळंदीतील जेष्ठांचा मृत्यू,
राजगुरूनगर येथे सर्वाधिक १६ रुग्ण, ग्रामीण भागात २६ रुग्णांची वाढ,
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ५५ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात २६ रुग्णांची भर पडली आहे. काल चाकण व आळंदीतील दोन जेष्ठांचा मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १९४६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २९ ) : राजगुरूनगर – १६, चाकण – ११ आळंदी – २ रुग्ण.
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २६ ) : मरकळ ४, कुरुळी, कान्हेवाडी, काळुस, धानोरे, चऱ्होली व राक्षेवाडी या ६ गावात प्रत्येकी २ रुग्ण, तर कुरकुंडी, निघोजे, मेदनकरवाडी, चिंबळी, आंबेठाण, शेलपिंपळगाव, शेलगाव, भोसे, कन्हेरसर व रेटवडी या १० गावात प्रत्येकी १ रुग्ण.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५५
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १९४६
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५०
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २७०
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १६२६
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर १६, चाकण ११.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०२ ( पुरुष, वय ६५, रा. चाकण ), ( पुरुष, वय ९२, रा. आळंदी )
=======