Wednesday, February 18, 2026
Latest:
आंबेगावकोरोनाविशेष

आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ५६२

आंबेगाव तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ५६२

 

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात सोमवारी नव्याने २८ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामध्ये मंचर १३, अवसरी बुद्रुक १, चंडोली बुद्रुक ३, गावडेवाडी १, पारगाव तर्फे खेड १, अवसरी खुर्द ४, वडगाव काशिंबेग १, आमोंडी १, कानसे २, घोडेगाव १ यांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५६२ झाली असून त्यातील ३९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्णालयात १५५ रुग्ण उपचार घेत असल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!