अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुखपदी विनोद महाळुंगकर
अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुखपदी विनोद महाळुंगकर
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते, श्री समर्थ सदगुरू श्रीपती बाबा महाराज यांचे निस्सीम भक्त व खेड तालुक्यातील अध्यात्मिक व सामाजिक चळवळीचे प्रणेते ह.भ.प. विनोद महाळुंगकर यांची महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय वारकरी महामंडळाच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. म्हाळुंगकर यांच्या निवडीनंतर पंचक्रोशीतील भाविक व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
———