Thursday, March 12, 2026
Latest:
काव्यमंचकृषीविशेषसण-उत्सव

काव्यमंच : श्रावणी बैलपोळा विशेष – तूच ‘बळीराजा’चा सोहळा

🐂तूच बळी राजाचा सोहळा🐂

 

श्रावणाच्यासवे सण
पहा झाले सारे गोळा
सर्त्या श्रावणास आला
बैला तुझा बैल पोळा॥धृ॥

थाटमाठ बघ तुझा
आता अवघा निराळा
पुरणाची गोड पोळी
आणि शृंगार सोहळा॥१॥

नाही तर नित्याचेच
जुंपायचे शेत मळा
सर्जा राजा कौतुकाने
बळी गातो गाणे गळा॥२॥

नित्याचेच भाळी तुझ्या
औत नांगराचा फाळा
आला तुझा बैल पोळा
लाड तुझे लडीवाळा॥३॥

स्वप्न बळीला सुखाचे
तूच दावितोस डोळा
तूच खराखुरा बघ
बळी राजाचा सोहळा॥४॥

निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!