‘या’ घाटात कोसळली दरड
महाबुलेटीन नेटवर्क / संतोष म्हस्के
भोर : भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात शुक्रवारी ( दि. ३ ) दुपारच्यावेळी वाघजाई मंदिराशेजारील दगडी भिंत कोसळल्याने काही वेळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्परतेने एका बाजुने रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे एस. बी. हल्लाळे यांनी सांगितले.
वरंधा घाटात शुक्रवार सकाळी पासून पाऊस सुरु झाला आहे. रस्त्यावर पाऊसाचे पाणी आल्याने संरक्षक भिंतीच्या शेजारील ओएससीची केबलसाठी खोदण्यात आलेल्या चारीतून पाणी जाऊन रस्त्याची भिंत कोसळली आहे. वाहनचालकांनी प्रवास करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याच्या कडेला दगडी भिंत तयार करण्यात आली असल्याचेही हल्लाळे यांनी सांगितले.