गुन्हेगारीबारामतीमहाराष्ट्र

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण :
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सागर वसंत माने आणि विक्रम काकासो मासाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.

दोघेही सोमेश्वरनगर-सोरटेवाडी येथील राहणारे आहेत. आरोपींना खेड मधील बहुळ मधून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित सुरेश गाडेकर ची शनिवारी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बारामती पोलीस देखील आरोपींचा शोध घेत होते. ही हत्या व्याजाच्या पैशातून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मयत रोहित गाडेकर हा आरोपींना दिलेल्या व्याजाच्या पैशांचा तगादा लावत होता. तसेच त्यांना मारहाण करायचा याच कारणावरून रोहित गाडेकरची हत्या करण्याचा प्लॅन केला.

शनिवारी रोहित गाडेकरची हत्या करण्यात आली. आरोपी खेड तालुक्यामध्ये फरार झाले. चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना माहिती मिळाली की, आरोपी हे खेड तालुक्यातील बहुळ येथे एका गोठ्यात लपून बसले आहेत. पोलिसांनी तात्काळ जाऊन त्यांना ताब्यात घेतल आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपींना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात येत आहे, अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!