Thursday, April 17, 2025
Latest:
ग्रंथालयप्रशासकीयप्रादेशिकमहाराष्ट्रमुंबईविशेषशैक्षणिक

महाबुलेटीन न्यूज : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ…

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ

महाबुलेटीन न्यूज

मुंबई, दि.११ : उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालय यांनी संगणकाधारीतग्रंथालय अनुदान व्यवस्थापन प्रणाली(Library Grant Management System) विकसित केली आहे. या प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला.

यावेळी उच्च तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून ग्रंथालय अनुदान विषयक सर्व कामकाज ऑनलाइन पध्दतीने सुरु होणार असून ग्रंथालयांच्या कामकाजाची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

अनुदान वितरण प्रक्रीयेचा जिल्हा स्तरावरील टप्पा कमी झाल्यामुळे राज्यातील सर्व ग्रंथालयांना एकाच दिवशी आणि एकाच वेळी अनुदान मिळणार आहे. त्याबाबतची माहिती सुद्धा ग्रंथालयास एसएमएसद्वारे मोबाईलवर मिळणार आहे.

राज्यातील ग्रंथालयांचा कामकाज अहवाल सादर करण्यासाठी प्रत्यक्ष कार्यालयात अथवा पोस्टामार्फत सादर करण्याची आता आवश्यकता असणार नाही. या प्रणालीमुळे कामकाज ऑनलाइन पद्धतीने पाठवता येईल त्यामुळे वेळेची आणि आर्थिक बचत होण्यास मदत होणार आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!