मंचर : वाढती रुग्ण संख्या व संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा इनसिडन्ट कमांडर जितेंद्र डूडी यांनी संपूर्ण मंचर शहर 7 जुलै ते 16 जुलै पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र ( containment zone ) म्हणून घोषित केले आहे. कलम 144 नुसार लोकांच्या हालचाली वर पूर्णपणे बंदी असेल. त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की, वैद्यकीय इमर्जन्सी शिवाय आपण घराबाहेर पडू नये. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी वगळता कुणालाही मंचर शहरात प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे मंचर गावचे आदर्श सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले आले.