लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते श्रीराम चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे व साठेनगर मध्ये प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्रोही साहित्य संमेलनांतंर्गत, कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेवून सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशी सूचना गारटकर यांनी दिली.
माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल राऊत, प्रा.अशोक मखरे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, सतीश सागर, ललेंद्र शिंदे, मयुर ढावरे, उमेश ढावरे, बापू आडसुळ, सचिन गायकवाड, बाळू आडसुळ, चंद्रकांत सोनवणे, विनायक लोंढे, राजु गुळीग, शिवाजी शिंदे, राजु शिंदे, संजय खंडाळे, नंदू खंडाळे, बापू थोरात, दादा ढावरे आदी उपस्थित होते.