कोरोना योध्यांसाठी रक्षाबंधन

महाबुलेटिन नेटवर्क
चाकण: खेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आज युवक काँग्रेसच्यावतीने सर्व कोरोना वाॅरियर्स चा सत्कार करण्यात आला, त्यांना मास्क व सॅनेटायझर देण्यात आले. तसेच त्यांच्यासमवेत रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
यावेळी प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस व युवती काँग्रेसच्या मुख्य समन्वयक प्रिया पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ दौंडकर यांच्यासह तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.