Thursday, April 17, 2025
Latest:
खेडपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रविशेष

खेड कोर्टात एकाच दिवसात पती-पत्नीचा घटस्फोट, खेड न्यायालयाचा अभूतपूर्व निकाल…

खेड कोर्टात एकाच दिवसात पतीपत्नीचा घटस्फोट
खेड न्यायालयाचा अभूतपूर्व निकाल

महाबुलेटीन न्यूज

राजगुरूनगर : खेड न्यायालयाने अभूतपूर्व असा निकाल देत सुनावणीच्या पहिल्याच तारखेस घटस्फोट मंजूर केला. महत्वाची बाबम्हणजे श्री. राजा सौ. राणी (नावे बदलली आहेत) यांचा दिनांक १० मे २०२२ रोजी विवाह झालेला होता, परंतु विवाहपश्चात एकामहिन्यातच दोघांनाही परस्परांचे स्वभाव, आवडीनिवडी आणि आयुष्याविषयीचा दृष्टीकोन वेगवेगळा असल्याचे निदर्शनास आलेलेहोते.

मित्र, नातेवाईक यांनी दोघांचीसमजूत काढूनही दोघेही एकत्र येण्याच्या निर्णयावर ठाम होते यातच दोघांनीही परस्पर समझोत्यानेविभक्त होण्याचा व्यवहारिक निर्णय घेतला. त्याबाबत त्यांनी खेड न्यायालयात कार्यरत वकील अॅड. आकाश . चोरडिया, अॅड. ऐश्वर्या . शेवकरी, अॅड. दिपाली . सहाने यांचेमार्फत दि. १४/०२/२०२४ रोजी विवाह याचिका दाखल केलेली होती. त्यावर दिनांक२२/०२/२०२४ रोजी पहिली सुनावणी नेमण्यात आलेली होती. सदर विवाहित दांम्पत्याचा समजूतदारपणाच्या भूमिकेस दाद देत मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड श्री. एम. बी. पाटील यांनी एकाच दिवसात घटस्फोट मंजूर करत दोघांनाही वैयक्तित बंधनातूनमुक्त केलेले आहे.  

  • बऱ्याचदा वैवाहिक वादापश्चात नवराबायकोची एकत्रित येण्याची इच्छा संपुष्टात येते; परंतु अहंकार, एकमेकांविषयीचा रागतसेच घटस्फोटाची प्रक्रिया बऱ्यापैकी किचकट असल्यामुळे विवाहित दाम्पत्याचे तारुण्य वादातच निघून जाते. सदर बाबीचीदखल घेऊन लवकरात लवकर घटस्फोट मंजूर करण्याचा मा. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर खेड श्री. एम. बी. पाटील यांचानिर्णय स्वागतार्ह आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!