काव्यमंच

काव्यमंच : काटे कोरांटी

काव्यमंच : काटे कोरांटी
——————————-
जरी काट्यात फुलते
नांव काट्याची कोरांटी
सोन्या सारखी फुलते
         माझी सोनसळी कांती॥धृ॥
गंध जरी मंद माझा
रंग खुलविते कांती
जरी काटे कोरांटी मी
             राना मधली रानटी॥१॥
झाली *निसर्गसखीच्या*
पहा मनाची मी शांती
येता कवितेत तिच्या
          झाली कवितेची क्रांती॥२॥
रुप रंग गंध माझा
जगी कुणी न जाणती
भाव माझिया मनाचे
           शब्द सखीचे जाणती॥३॥
अशी काव्यात फुलते
एक काट्याची कोरांटी
जरी काटे कोरांटी मी
         माझी सोनसळी कांती॥४॥
    * निसर्गसखी सौ मंगला मधुकर रोकडे
      🌼🌼  🌼🌼🌼🌼  🌼🌼

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!