ग्रामसेवक युनियनच्या समस्या सकारात्मक पध्दतीने सोडवू : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
महाबुलेटीन नेटवर्क
इंदापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या समस्या सकारात्मक पध्दतीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज ( दि.१२ जुलै ) युनियनच्या शिष्टमंडळास दिले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन इंदापूर शाखेचे अध्यक्ष अमोल मिसाळ, सचिव रविंद्र बनसुडे व युनियनच्या पदाधिका-यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या येथील निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली.
प्रशासकीय सेवा करताना येणाऱ्या अडचणी, कोरोना पार्श्वभूमी व युनियनचे विविध प्रश्न यावर यावेळी चर्चा झाली. प्रशासनातील वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणेकामी पुढाकार घेवून प्रयत्न करावा, अशी विनंती शिष्टमंडळाच्या वतीने पाटील यांना करण्यात आली. युनियनच्या समस्या सकारात्मक पध्दतीने सोडवण्यात येतील, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.