आळंदी भाविकांचे स्वागतास सज्ज ; आळंदीत हरिनाम गजर ; भाविक दाखल
आळंदी भाविकांचे स्वागतास सज्ज ; आळंदीत हरिनाम गजर ; भाविक दाखल

महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचा सप्त शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षातिल आळंदी कार्तिकी यात्रेस भाविक राज्य परिसरातून आळंदीत दिंड्यांदिंड्यांतून हरिनाम गजरात आळंदीत दाखल होत असून हजारो भाविक आळंदीत दाखल झाल्याने आळंदीत विविध ठिकाणी हरिनाम गजर सुरू झाला आहे. राज्यातून येणाऱ्या भाविकांसह नागरिकांची यात्रा काळात गैरसोय होऊ नये यासाठी आळंदी नगरपरिषदेने विविध नागरी सेवा सुविधां देण्यासह उपाय योजना केल्या आहेत. नगरपरिषद प्रशासन भाविकांचे स्वागतास सज्ज असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.
आळंदीत कार्तिकी यात्रा काळात सोहळ्यास येणाऱ्या भाविकांसाठी आळंदी नगरपरिषदेने पुणे जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचना प्रमाणे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपाध्यक्ष आदित्यराजे घुंडरे, प्रांताधिकरी विक्रांत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली जोरदार तयारी करण्यात आली आहे. यात्रा काळात भाविकांना नागरी सुविधा या अंतर्गत देण्यात येणार असून नागरी सेवा सुविधा देण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
पाणी पुरवठा विभागाचे माध्यमातून प्रस्थान कालावधीत २४ तास पंपिग चालु ठेवुन झोन पध्दतीने पुरेशा प्रमाणात नियमित शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. पाणी पुरवठा केंद्रामधील मशिनरी, मोटार्स इत्यादी सुस्थितीत ठेवण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,पुणे यांचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे.तांत्रिक अधिका-यांचे मार्गदर्शनाने पाणी पुरवठा नियमित होण्यासाठी दक्षता घेण्यात आली असल्याचे पाणी पुरवठा समिती सभापति तथा उपनगराध्यक्ष आदित्यराजे घुंडरे यांनी सांगितले. आळंदी शहराकरीता पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांचेकडे मागणी करण्यात आली आहे. पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.या शिवाय शासकीय पाण्याचे टँकर तैनात ठेवण्यात येणार आहेत.
● संयुक्त अतिक्रमण कारवाई चे नियोजन
पिंपरी चिंचवड महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,पोलिस यंत्रणा यांचे मार्फत संयुक्त अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले आहे.शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. रहदारीला अडथळा होणार नाही,याची यातून दक्षता घेण्यात येत आहे.
● आळंदी शहरात प्रकाश व्यवस्था प्रभावी
संपूर्ण आळंदी शहरात रस्त्यावरील दिवाबत्ती प्रभावी ठेवण्याचे नियोजन केले असून याची तयारी पूर्ण झाली आहे. इंद्रायणी नदी घाट, प्रदिक्षणा रस्ता व शहरा अंतर्गत रस्ते, आवश्यक त्या ठिकाणच्या रस्त्यावरील नादुरूस्त विदयुत दिवे युध्द पातळीवर दुरूस्त करून बसविण्यात आले आहेत. पालखी मार्ग, शहरा अंतर्गत असलेले चौक इंद्रायणी नदी घाट आदी ठिकाणी फ्लडलाईट (व्हाईट फोकस) लावुन जादा विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे.
● आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत
नगरपरिषद कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात सर्व शासकिय खात्यातील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या ठिकाणी संपर्क यंत्रणा उपलब्द्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.विविध खात्या मार्फत यात्रा काळात केलेल्या नियोजनाचा आराखडा,नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे नियुक्त केलेल्या वेळे प्रमाणे नांव व संपर्काची यादी ठेवण्यात आली आहे.
● सी.सी.टी.व्ही ची कार्तिकी यात्रेवर नजर
कार्तिकी यात्रा काळात सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी विविध ठिकाणी शहरात सी.सी.टी.व्ही ची यात्रेवर नजर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी पोलिस ठाण्यात तसेच आळंदी नगरपरिषद कार्यालयातून यात्रा व गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
● पब्लीक अॅडरेस सिस्टिम वॉकी-टॉकी
पब्लीक अॅडरेस सिस्टिम वॉकी-टॉकी शहरात कार्यरत ठेवण्यात आली आहे.संपुर्ण शहरामध्ये सुचना व हरविलेल्या व्यवक्तींची माहिती देण्यासाठी केंद्रीय सुचना यंत्रणा बसविण्यात येत आले. यात्रा काळात भाविक भक्तांना आवश्यक सेवा सुविधा पुरविणे बाबत तसेच इतर शासकिय यंत्रणा संपर्क साधण्यास नियोजन झाले.
● स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदी साठी उपाय योजना
आळंदी हे स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदी साठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यासाठी स्वच्छता सफाई ठेकेदार आणि पालिकेचे कामगार यांचे वतीने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे.आळंदी शहरातील तुंबलेली गटारे,कचरा कुंड्या स्वच्छ ठेवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. विल्हेवाट लावणे, पावडर व आवश्यक ते जंतुनाशके फवारणे तसेच फॉगिंगचे शहरात काम सुरु झाले आहे. धुराडी फवारणी प्राधान्याने करण्यात आली आहे. नगरपरिषदेने अनेक ठिकाणी मोबाईल टॉयलेट बसविले आहे. चाकण चौक, शाळा क्र.१, नगरपरिषदेच्या ग्राऊंडवर सुलभ शौचालय कार्यरत ठेवले आहे. तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत शेकडो शौचालय, नगरपरिषद शाळा क्र.४ ,एस.टी.स्टॅंडचे मैदानात, नविन पुला लगत, सिध्दबेटाकडे जाणा-या रस्त्याच्या कडेने जादा शौचालयाची उभारणी करुन स्वच्छते बाबत व्यवस्था केली असल्याने शहरात आरोग्य सेवेसह यात्रा नियोजनातून नगरपरिषद भाविकांचे स्वागतास सज्ज झाली आहे. धर्मशाळेतील कचरा गोळा संकलन केले जाणार आहे. यात्रा कालावधीत इंद्रायणी नदीघाटावर जंनजागृती साथी कक्षातुन संपर्काचे आवाहन केले जात आहे.

● प्लास्टिक मुक्त कार्तिकी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
आळंदी तीर्थक्षेत्र स्वच्छ सुंदर राहण्यास नियोजन केले असून भाविकांनी देखील यात्रा काळात शहर स्वच्छ कसे राहील यासाठी नगरपरिषदेस सहकार्य करून प्लास्टिक मुक्त कार्तिकी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आळंदीत माझी वसुंधरा स्वच्छता अभियान २ अबविले जात आहे. यासाठी बलून द्वारे जागृती करण्यात आला आहे. कागदी पत्रावळी आणि द्रोणचा वापर करण्याचे आवाहन आळंदीत करण्यात आले आहे. आळंदी शहर स्वच्छ रहाण्यासाठी शहरात २४ तास कचरा उचलण्याचे काम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
लातूर येथील जेष्ठ वारकरी ज्ञानोबा कांबळे हे लातूर-आळंदी-देहु असा सायकल वरुन कार्तिकी वारी सोहळ्यास प्रवास करीत असून आळंदी, देहु, पंढरपूर देवदर्शन वारी मोठ्या श्रद्धेने करीत आहे. ७० वर्ष झाले असून देखील ते सायकल्ने वारीत सहभागी झाले असून त्यांचेशी आळंदीत ग्रामस्थ ज्ञानेश्वर घुंडरे यांनी संवाद साधताना ते म्हणाले, कार्तिकी आषाढी वारीत खूप आनंद व समाधान मिळते.
००००


लातूर येथील जेष्ठ वारकरी ज्ञानोबा कांबळे हे लातूर-आळंदी-देहु असा सायकल वरुन कार्तिकी वारी सोहळ्यास प्रवास करीत असून आळंदी, देहु, पंढरपूर देवदर्शन वारी मोठ्या श्रद्धेने करीत आहे. ७० वर्ष झाले असून देखील ते सायकल्ने वारीत सहभागी झाले असून त्यांचेशी आळंदीत ग्रामस्थ ज्ञानेश्वर घुंडरे यांनी संवाद साधताना ते म्हणाले, कार्तिकी आषाढी वारीत खूप आनंद व समाधान मिळते.