Wednesday, October 15, 2025
Latest:
इतरजुन्नरपर्यटनपुणे जिल्हाप्रादेशिकमहाराष्ट्रयशोगाथाराष्ट्रीयविशेष

‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये चिमुकल्या प्रांजल चव्हाणच्या विक्रमांची हॅट्रिक, ● शिवरायांच्या जन्मभूमितील चिमुकलीचे सामान्यज्ञान थक्क करणारे…

‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये चिमुकल्या प्रांजल चव्हाणच्या विक्रमांची हॅट्रिक,
● शिवरायांच्या जन्मभूमितील चिमुकलीचे सामान्यज्ञान थक्क करणारे…

महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करणारी चार वर्ष चार महिन्याची सर्वात लहान वयाची मुलगी, ५९ सेकंदामध्ये सर्वाधिक ४० साहित्याची नावे सांगणारी सर्वात लहान मुलगी, ५४ सेकंदामध्ये सर्वाधिक ४५ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींच्या समाधी स्थळांची नावे सांगणारी सर्वात लहान मुलगी म्हणून ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये हॅट्रिक करणारी प्रांजल उध्दव चव्हाण ही भारतातील पहिलीच सर्वात लहान वयाची मुलगी ठरली आहे.  

प्रांजल उध्दव चव्हाण ही मुळगाव देवताळा, ता. औसा येथील असून तिचे वडील उध्दव चव्हाण हे तलाठी म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आर्वी येथे कार्यरत आहेत. वडील उध्दव चव्हाण आणि दीपाली चव्हाण यांनी लहानपणापासून प्रांजलला किल्ले चढण्यासाठी प्रोत्साहन दिले. यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. प्रांजल हिने वयाच्या चौथ्या वर्षीच महाराष्ट्रातील सर्वात अवघड गड किल्ले शिवनेरी, चावंड, हडसर, नारायणगड व हरिश्चंद्रगड सर करण्याचा बहुमान मिळविला. ट्रेकरची पंढरी म्हणून ओळखला जाणारा हरिश्चंद्रगड व महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर तारामती शिखर सर केल्यानंतर यावेळी महाराष्ट्रातील सर्वात उंच व अवघड असलेले कळसुबाई शिखर प्रांजलने दोन तास ५८ मिनिटांत सर करून एक नवा विक्रम नोंदविला आहे. त्यामुळेच चार वर्ष चार महिन्याची चिमुकली प्रांजल उध्दव चव्हाण हिची सर्वात लहान वयाची मुलगी म्हणून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद करण्यात आली आहे.

जगातील सर्व देश व त्यांच्या राजधान्या, जागतिक घटना व सामान्यज्ञान सहज तोंडपाठ असलेल्या चार वर्षाच्या प्रांजल उध्दव चव्हाण या मुुुलीची अलौकिक बुद्धिमत्ता, ६० सेकंदात सर्वाधिक ४० साहित्यांची नावे सांगणारी देशातील सर्वात लहान मुलगी म्हणून नोंद झाली. त्याबरोबरच प्रांजलने ५९ सेकंदामध्ये रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ, अर्थशास्त्र व मेघदूत हे महत्वाचे पुस्तक, मृत्युंजय व स्वामी यासारख्या गाजलेल्या कादंबऱ्या, आनंदमठ व इंडिया यासारखे प्रसिद्ध साहित्य तसेच यामा व ययाति यासारखे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्य तसेच लज्जा, हैंलमेंट व हेरी पोर्टर या सारख्या आंतरराष्ट्रीय पुस्तकाची नावे सांगितली. या रेकॉर्डची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेऊन प्रांजलच्या या विक्रमांची नोंद घेण्यात आली असून त्याबद्दल तिला या रेकॉर्डचे प्रमाणपत्र, मेडल, एशिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पुस्तकाची प्रत, युनिक पेन, कार स्टिकर्स, आय डी कार्ड देण्यात आले. प्रांजलच्या या कामगिरीचे सर्व क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. प्रांजलला तिची आजी गंगुबाई चव्हाण व कांताबाई जाधव यांनी प्रोत्साहन दिल्याचे प्रांजलने सांगितले.
——————————————————————–

प्रांजलने केलेली उत्कृष्ट नेत्रदीपक कामगिरी :-
● महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर २ तास ५८ मिनिटांत सर करणारी कमी वयाची मुलगी म्हणून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद.
● ४० प्रसिद्ध साहित्याची नावे ५९ सेकंदामध्ये नावे सांगणारी कमी वयाची मुलगी
● ४५ भारतातील प्रसिद्ध व्यक्तीची समाधी स्थळ नावे ४५ सेकंदात सांगणारी कमी वयाची मुलगी म्हणून ‘एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद. 
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!