वाडा व सुरकुलवाडी येथे आदिवासी दिन साजरा
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
वाडा : सुरकुलवाडी व वाडा ( ता. खेड ) येथे शासकीय नियमांचे पालन करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्देशानुसार आदिवासी दिनाचे आयोजन नियोजन आदिवासी एकता संघटनेच्या वतीने करण्यात आले होते.
दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा जागतिक आदिवासी दिन या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने वाडा ग्रामपंचायत कार्यालयात गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व आदिवासी एकता संघटनेचे कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टनसिंग ठेऊन प्रतिमा पूजन करून साजरा केला. तसेच जि. प. शाळा सुरकुलवाडी येथे भगवान बिरसा मुंडा, क्रांतिसूर्य राघोजी भांगरे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
आदिवासी दिनानिमित्त तरुण वर्गात विशेष उत्साह दिसून आला. शिवाय वाडा गावच्या सर्व आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन प्रतीमा पूजन करण्यात आली व मुलांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
——