स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन… रक्तदान शिबिर व विविध उपक्रमांनी जयंती साजरी, १०१ जणांनी केले रक्तदान…
स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
रक्तदान शिबिर व विविध उपक्रमांनी जयंती साजरी, १०१ जणांनी केले रक्तदान…
महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : स्व. गुलाबराव प्रतिष्ठाण संचालित, ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मिडियम स्कूल व स्व. आ. सुरेशभाऊ गोरे माध्य. विद्यालय व ज्युनि. कॉलेज चाकण येथे स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त भाऊंना विनम्र अभिवादन करून रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरात १०१ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
यावेळी स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चाकण या शाळेच्या नामफलकाचे अनावरण व शालेय विद्यार्थी यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
या वेळी भव्य रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्लो सायकल स्पर्धा, ऑनलाईन वकृत्व स्पर्धा, रक्तदान शिबिर, महिला सक्षमीकरण व्याख्यान, तालुक्यातील शाळांना साहित्य वाटप आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे
यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मानव विकास कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय नामदेव गोरे हे होते. यावेळी खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनिषाताई सुरेशभाऊ गोरे, प्रा. शैलजा सांगळे, सेक्रेटरी लायन्स क्लब भोसरी, कु. राधा संतोष मोरे पुणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव वरपे, तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे, लोकनेते अशोकराव खांडेभराड, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष, युवा नेते नितीन गुलाबराव गोरे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, मा. सभापती भगवानशेठ पोखरकर, मा. उपसभापती ज्योतीताई अरगडे, महिला आघाडी तालुका प्रमुख नंदाताई कड, मा. उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, शिवसेना शहर प्रमुख महेश शेवकरी, मा. सरपंच चिमाजी सातकर, एल. बी. तनपुरे, लक्ष्मणराव जाधव, श्रीनाथ लांडे,मा. सरपंच केशव अरगडे, मा. सरपंच हनुमंतराव कड, संतोष मोरे, रामदास जाधव, दिलीपराव गोरे, कृष्णकांत जाधव, चाकण पतसंस्था संचालक शांताबाई गोरे, दिपालीताई गदादे, संगीताताई गोरे, अनिताताई गोरे, सविताताई गोरे, श्रद्धाताई गोरे, सुप्रियाताई गोरे, पूजाताई गोरे, तेजस्विनी बागडे, विषयतज्ञ दयानंद शिंदे, संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, संचालक अंकुशराव पवार, विष्णूशेठ गोरे, निलेशशेठ गोरे, ओंकार सुरेशभाऊ गोरे, विशाल बारवकर, योगेश गोरे, रत्नेश शेवकरी, हर्षवर्धन गोरे, विराज गोरे, शुभम गोरे, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्यध्यापक, शिक्षक तसेच गोरख करपे सर, विवेक शिंदे सर, मुख्याधिपिका प्रमिला गोरे, माधुरी गोरे सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक कॊरोना नियमांचे पालन करून उपस्थित होते.
तसेच स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने स्व. आमदार सुरेशभाऊ गोरे जनसंपर्क कार्यालय येथे मोरया ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १०१ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनभाऊ गोरे यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.
००००