प्रियदर्शनी स्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात…
प्रियदर्शनी स्कूलमध्ये 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात.

महाबुलेटीन न्यूज l चाकण : कोरोनाचा धोका अजूनही टळला नाही. 3 जानेवारी पासून संपूर्ण देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणालासुरुवात झाली आहे. या नुसार मुलांच्या आरोग्याला महत्त्व देत चाकण जवळील वाकी खुर्द येथील प्रियदर्शनी स्कूल येथे बुधवारदिनांक 5 जानेवारी 2022 रोजी लसीकरण आयोजित केले होते. यामध्ये प्रियदर्शनी स्कूल मधील तब्बल 156 विद्यार्थ्यांचे लसीकरणकरण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला.
या लसीकरणाचे आयोजन आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री महाजन, आरोग्य सेवक अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेहोते. लसीकरणासाठी प्रियदर्शनी शाळेचे संस्थापक महेंद्रसिंग, मुख्याध्यापिका डॉ. आरती हेमरजनी, तेजस्विनी राजपूत उपस्थित होत्या. लसीकरणासाठी विद्यार्थी आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.
0000