श्री रेणुका माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी
श्री रेणुका माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी
महाबुलेटीन न्यूज
चाकण : रासे ( ता. खेड ) येथे श्री बापदेव शिक्षण संस्था द्वारा संचलीत श्री रेणुका माध्यमिक विद्यालयात शासन परिपत्रक दिनांक 7/7/2021 च्या अनुषंगाने शाळा सुरू करणेबाबत ग्रामस्तरावर सरपंच श्री. किरण ठाकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय शिंदे, ग्रामसेवक श्री. अनिल फुलपगार, वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुजाता मॅडम, ग्रामपंचायत सदस्य श्री.लक्ष्मण शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. वामन मुंगसे, सचिव श्री. दिपक मुंगसे, केंद्रप्रमुख श्री. संदिप जाधव, मुख्याध्यापक श्रीम. सुवर्णा वाळुंज, शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. संतोष काळे सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून चर्चेला सुरुवात झाली. यामध्ये सर्वानुमते शाळा सुरू करणेबाबत ठराव संमत करण्यात आला. सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात यावे, असे ठरल्याने दिनांक 19/7/2021रोजी आरोग्य विभाग, शेलपिंपळगाव यांच्या सौजन्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यी, शिक्षक यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
याप्रसंगी बापदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विजयभाऊ शिंदे, आरोग्य अधिकारी डाॅ. सुजाता मॅडम, आरोग्य सहायक श्री. केदार, आशा स्वयंसेविका, शिक्षक पालक संघाचे सदस्य गणेश थोरात, मा.चेअरमन प्रदीप शिंदे, मुख्याध्यापक श्रीम. सुवर्णा वाळुंज, शिक्षक श्री. संजीव भोर, संजय पिचके, श्री.संतोष काळे, गायकवाड कल्पना व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मुलांची कोरोना टेस्ट करण्यात आल्याने पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. अशी माहिती पुणे जिल्हा मराठी अध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री. संतोष काळे सर यांनी दिली.
००००