रोटरी क्लब एअरपोर्ट तर्फे चाकण नगरपरिषदेस यांना ऑक्सी मिटर, थरमोमीटर, N 95 मास्क प्रदान
चाकणला 18 व 19 तारखेला घरोघरी जाऊन सर्वेक्षण
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : रोटरी क्लब चाकण एअरपोर्टच्या वतीने चाकण नगरपरिषद यांना 5 ऑक्सी मिटर, 5 थरमोमीटर, N 95 मास्क प्रदान करण्यात आले.
दिनांक 18 व 19 सप्टेंबर रोजी चाकण नगरपरिषदेच्या वतीने संपूर्ण चाकण शहरात घरोघरी जाऊन ऑक्सिजन लेवल व टेंपरेचर चेक केले जाणार आहे, त्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावे व घरी थांबून प्रशासनास मदत करावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
साहित्य प्रदान करताना रोटरी क्लब चाकण एअरपोर्टच्या प्रेसिडेंट सौ. वर्षाताई कड, सेक्रेटरी सुनील कड, सुधीर वाघ, धीरज परदेशी, संतोष वाव्हळ, चाकण नगरपरिषदचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, उपनगराध्यक्ष ऋषिकेश झगडे, नगरसेवक प्रकाश भुजबळ, सुदाम शेवकरी, महेश शेवकरी, प्रकाश गोरे, सतीश मंडलिक, मंगलताई गोरे, हुमाताई शेख, स्नेहलताई जगताप, साहेबराव कड, विशाल नाईकवाडी व इतर नगरसेवक उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांनी रोटरीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.