Thursday, March 12, 2026
Latest:
खेडनिवड/नियुक्ती

रिपब्लिकन सेनेच्या चाकण शहराध्यक्षपदी विजय वाघमारे यांनी निवड

महाबुलेटीन नेटवर्क 
चाकण : रिपब्लिकन सेनेच्या चाकण शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय सुदाम वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
रिपब्लिकन सेना सरसेनानी आनंदराज आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या आदेशाने पुणे शहराध्यक्ष सुनील ढसाळ यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
स्वाभिमानी व सक्षम नेतृत्वावर विश्वास  ठेऊन तळागाळातील वंचित समाज बांधवापर्यंत जाऊन सामाजिक कामाबरोबरच पक्ष संघटना बळकट करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय वाघमारे यांनी सांगितले. यावेळी पिंपरी-चिंचवड अध्यक्ष धुराजी शिंदे, संदानंद गवई, तालुका संघटक सामाजिक कार्यकर्ते संदिप साऴूखे, लहू होंके, दूर्गेश यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!