राजगुरूनगर नगरपरिषदेकडून आरोग्य तपासणी सुरू, आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते उदघाटन,
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत सर्वेक्षणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या उपक्रमांतर्गत आज सकाळी राजगुरुनगर नगरपरिषदेने संपूर्ण राजगुरुनगर शहरात सर्वेक्षण सुरू केले.

खेड तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते नागरिकांची ऑक्सिमिटर व थर्मामिटरने तपासणी करून सर्वेक्षणाच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. या सर्वेक्षणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

या टीममध्ये मुख्याधिकारी प्रकाश पाटील, सर्व स्टाफ, वैद्यकीय कर्मचारी सहभागी झाले असून सकाळी ९ वाजता सर्वेक्षण सुरू झाले आहे. तहसीलदार सुचित्रा आमले यांनी नगरपरिषदेच्या सर्वेक्षण पथकाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आहे.