पुणे-नासिक महामार्गावर एकावर एक चार कार धडकल्या
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण : पुणे-नासिक महामार्गावर चाकण येथील हॉटेल महाराजा समोर अचानक ब्रेक दाबल्याने एकावर एक चार मोटार कार धडकल्याने वाहनांचे नुकसान झाले असून या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या प्रसंगाचे वार्ताहर कडून व्हिडीओ चित्रीकरण होत असल्याचे समजताच पुढील दोन कार चालकांनी अपघात स्थळाहून धूम ठोकली.