पुणे जिल्ह्यात पाऊण लाख कोरोना बाधित रुग्ण
45 हजारहून अधिक रुग्ण बरे होऊन गेले घरी
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : जिल्हयात 74 हजार 649 कोरोना बाधीत रुग्ण असून 45 हजार 835 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 59 असून यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 221, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 309 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 108, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला असून 915 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.40 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.35 टक्के इतके असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.