पुणे जिल्ह्यातून 40 हजार रुग्ण बरे होऊन घरी

पुणे : पुणे जिल्हयातील 65 हजार 591 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 40 हजार 45 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 927 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 16 हजार 562, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 117, पुणे कॅन्टोंन्मेंट 174, खडकी विभागातील 32, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 957, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 85 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 619 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 154, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 281, पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 32, ग्रामीण क्षेत्रातील 79, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 42 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 827 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.05 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.47 टक्के इतके असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.