प्रल्हाद वरे यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय हा राष्ट्रीय कृषी पुरस्कार जाहीर

पुणे: कृषी अनुसंधान परिषदेच्या (ICAR)नवी दिल्लीच्या ९२ व्या स्थापना दिनानिमित्त परिषदेतर्फे प्रदान केला जाणारा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च “पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय कृषी पुरस्कार २०१९ प्रल्हाद गुलाबराव वरे यांना जाहीर करण्यात आला . कृषी क्षेत्रातील हा अतिशय सन्माननीय पुरस्कार समजला जातो. प्रल्हाद वरे यांचे कृषी क्षेत्रातील तसेच सेंद्रिय शेतीबद्दलची चळवळ या कामाची दखल या पुरस्काराने घेतली गेली.
या पुरस्कारावेळी ऑनलाईन वेबिनार (ICAR)द्वारे नरेंद्रसिंह तोमर (कृषिमंत्री भारत सरकार) , पुरोशोत्तम रूपाला(कृषी राज्यमंत्री भारत सरकार), कैलास चौधरी (कृषी राज्यमंत्री भारत सरकार) तसेच डॉ . त्रिलोचन महापात्रा व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या कृषी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रल्हाद वरे यांनी उपस्थतांचे तसेच बारामती मधील कृषी तज्ञ पुणे- बारामतीमधील अधिकारी व इतर मान्यवरांचे ही आभार व्यक्त केले. बारामती व मोर्फा तसेच सर्व शेतकरी बांधवांचे यात महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्र बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे सीईओ निलेश नलावडे , कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ सय्यद शाकीर अली, संतोष गोडसे, विवेक भोईटे, डॉ रतन जाधव,संतोष करंजे, मिलिंद जोशी, यशवंत जगदाळे, चंद्रकांत दाते,संदीप बाबर, प्रफुल्ल पोटे तसेच मोहन परकाळे , प्रशांत वरे ,रोहित अहिवळे अजिंक्य वरे व पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.