महाळुंगे इंगळे चौकीतील आरोपीसह एक पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
महाबुलेटीन नेटवर्क : प्रतिनिधी
म्हाळुंगे : दोन दिवसापूर्वी महाळुंगे इंगळे पोलिसांनी एका आरोपीला एका गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. त्याला काही लक्षणे आढळल्याने त्याची कोरोना चाचणी कर्ली असता तो पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर चौकीतील एक पोलीस अधिकारी देखील पॉझिटिव्ह आल्याने पोलिस चौकीमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम काटेकोर पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी देखील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.