पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनावर मात, पोलीस ठाण्यात पुष्पवृष्टी करून केले स्वागत

महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
मंचर : पुणे जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस नाईक सागर गायकवाड यांनी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले असता पोलीस बांधवांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत केले. कोरोनाला घाबरून खचून जाऊ नये, संयम राखावा, आवश्यक तेवढी काळजी नक्कीच घ्यावी, असा प्रेरक संदेश कोरोना योद्धा सागर गायकवाड यांनी दिला आहे. कर्तव्यावर हजर होत असताना मंचर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे व सर्व पोलिस बांधवांनी त्यांचे फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केले.