Sunday, April 20, 2025
Latest:
कोरोनापिंपरी चिचंवडमहाराष्ट्रविशेष

पिंपरी-चिंचवडचे ‘हे’ रुग्णालय राज्यात ‘लई भारी’! मृत्यूदर दोन टक्क्यांखाली

महाबुलेटिन नेटवर्क | विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : शहरात असणारे वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नाना कोरोनाविरुद्ध लढाईत चांगले यश मिळत असल्याचे दिसत आहे. राज्यातील कोविड19 वर उपचार करणाऱ्या रुग्णालयांपैकी वायसीएम चा मृत्युदर  सर्वात कमी म्हणजे दोन टक्क्यांच्या खाली (१.८६ टक्के ) इतका आहे.
       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  कोविडसंदर्भात राज्यातील रुग्णालयांचा आढावा  घेतला. त्यामध्ये राज्यातील सर्व कोविड समर्पित रुग्णालयांची माहिती देण्यात आली.   पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्वात कमी मृत्यूदर असल्याचे सांगण्यात आले.  मृत्यूदर आणखी कमी  व्हावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिकेला दिल्या आहेत.
           कोरोना  या महामारीत संसर्गाचे प्रमाण प्रचंड वाढत आहे.  कोरोनावर अद्याप कोणतेही ठोस औषध, लस अथवा उपचार पद्धती नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळेच रूग्ण वाढले आहेत. असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही मोठे आहे. मृत्यूचे प्रमाण कमी ठेवण्यात सध्या उपलब्ध औषधे, प्रशासन-डॉक्टरांचे एकत्रित प्रयत्न यांमुळे यश येत असल्याचे दिसते.  वायसीएम रुग्णालयात कोरोना संसर्गाने आजपर्यंत साठ मृत्यू झाले असून त्याचे प्रमाण  १.८६ टक्के आहे. राज्यातील कोरोनवर उपचार केल्या जाणाऱ्या  रुग्णालयांपैकी वायसीएमएचा मृत्यूदर सर्वात कमी आहे.
     वायसीएम रुग्णालयात १२ एप्रिल रोजी शहरातील कोरोनाचा पहिला बळी गेला.  त्यानंतर शहरातील तीस आणि शहराबाहेरील परंतु वायसीएम रुग्णालयात उपचार घेणा-या तीस अशा एकूण साठ जणांचा वायसीएममध्ये मृत्यू झाला आहे. मृत्यूचे हे  प्रमाण १.८६ टक्के आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!