पर्याय प्रतिष्ठान व ग्रामपंचायत टेकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजनेअंतर्गत लोक सहभागातून शोष खडडे आणि वृक्षसंवर्धन उपक्रम सुरू
महाबुलेटीन न्यूज पाईट : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामपंचायत टेकवडी व पर्याय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार हमी योजनेअंतर्गत लोकसहभागातून शोष खडडे आणि वृक्षसंवर्धन उपक्रम सुरू करण्यात आले. पर्याय प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष वामन बाजारे यांनी टेकवडी ( ता. खेड ) गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी, तरुणांना रोजगार हमी योजना, घर तेथे शोषखड्डे योजना, वृक्षसंवर्धन बिहार पॅटर्नची सविस्तर माहिती दिली.
जेष्ठ पत्रकार हनुमंत देवकर यांचा पर्याय प्रतिष्ठान व ग्रामपंचायत टेकवडी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला..
सरपंच विट्ठल शिंदे यांनी गावातील सर्व कुटुंब यांचे जॉब कार्ड काढून या कार्यक्रमाला गती देणार असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर बेंदुरे, दिलीप बेंदुरे सर, दत्तात्रय शिर्के, अविनाश कावडे, आकाश जाचक, मोहन बेंदुरे, बबन बेंदुरे, शंकर बेंदुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाला हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार हनुमंतराव देवकर, हभप. शरदमहाराज थोरात, नवनाथ थोरात या मान्यवरांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. दिलीप बेंदुरे सर यांनी आभार मानले. ००००