सतत हसतमुख,अष्टपैलू व्यक्तिमत्व..
निधन वार्ता : अमित कड
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील उद्योजक व युवा सामाजिक कार्यकर्ते अमित नामदेव कड ( वय ४० ) यांचे गुरुवारी ( दि. २३ जुलै ) दुःखद निधन झाले. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन मुले, चुलते असा परिवार आहे. येथील भैरवनाथ सोसायटीचे माजी चेअरमन व माजी ग्रा. पं. सदस्य कांताराम भाऊसाहेब कड यांचे ते पुतणे, तर प्रगतशील शेतकरी अजित कड यांचे ते धाकटे बंधू होत.
सतत हसतमुख, सर्वांना हवाहवासा वाटणारा, गावातील अबाल वृद्धांचा मित्र, आणि कायम इतरांना मदत करण्याची भावना, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेला अमित अचानक गेल्याने खराबवाडी गावात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने गावातील सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गावातील सर्व ग्रामस्थ, नातेवाईक व मित्र परिवाराच्या वतीने अमितला भावपूर्ण श्रद्धांजली….