Thursday, April 17, 2025
Latest:
कोरोनामहाराष्ट्रविशेषसण-उत्सव

माउलींच्या पादुकांसोबत ‘हे’ वीस मानकरी जाणार पंढरीला….

महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
आळंदी देवाची : संत ज्ञानेश्वर माउलींच्या चल पादुका आषाढ शुद्ध दशमीला ( दि. ३० ) रोजी आषाढी वारीतून एसटी बसने पंढरपूरला जाणार असून पुढील वीस मानकरी पादुकांसोबत जाणार आहेत. दिंडीसोबत एक पुजारी, एक चोपदार व मानकरी यांना नेण्यात येणार असल्याचे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे यांनी सांगितले.
मंगळवारी ( दि. ३० ) रोजी सकाळी माउलींच्या पादुकांवर पवमान पूजा झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास नैवद्य दाखवून दुपारी एकच्या सुमारास माउलींच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ करण्याची तयारी होईल. संपूर्ण एसटी बसचे सॅनिटायझेशन करण्यात येणार असून सोबतच्या वारकऱ्यांना फेसशील्ड, मास्क देण्यात येणार आहे. वीसही वारकऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. आजोळघरातील पादुका ठीक एक वाजता पालखी सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात देण्यात येतील. त्यांच्या सोबत उर्जितसिंह शितोळे सरकार व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई असणार आहेत. माउलींच्या पादुका पंढरपूरमध्ये पोहोचवून परत माघारी आळंदीला आणण्याची जबाबदारी खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांच्यावर आहे.

 

पोलीस बंदोबस्तात एसटी बसमध्ये पादुकांसोबत जाणार ‘हे’ वीस मानकरी
पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त ऍड. विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, उर्जितसिंह शितोळे सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक १ मधील ऋषिकेश वासकर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक २ मधील अविनाश भोगाडे, दिंडी क्रमांक ३ मधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक १ मधील चंद्रकांत तांबेकर खडकतकर, दिंडी क्रमांक २ मधील श्रीकांत टेंभूकर, दिंडी क्रमांक ३ मधील भानुदास टेंभूकर, दोन आळंदीकर मानकरी, एक पुजारी, एक कर्णेकरी, एक शिपाई हे वीस मानकरी माउलींच्या पादुकांसोबत एसटीने पंढरपूरला जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!