महाबुलेटिन ब्रेकिंग न्यूज : माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल
महाबुलेटिन न्यूज / प्रतिनिधी
अहमदनगर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून आंदोलनासाठी बेकायदा गर्दी, जमाव जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखेपाटील व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ४० आंदोलकांवर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी दुधाचे दर वाढवून द्या व १० रुपये थेट अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अशी मागणी करून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता येथे नगर-मनमाड रस्त्यावर रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले होते.