महाबुलेटीन प्रस्तुत इकोफ्रेंडली गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
गणपती सजावट स्पर्धेत हेमंत बोंबले व मच्छिन्द्र दवणे प्रथम,
गौरी सजावट स्पर्धेत जयाताई मोरे प्रथम
महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : महाबुलेटीन न्यूज आयोजित इकोफ्रेंडली गौरी गणपती सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून गणपती सजावट स्पर्धेत राजगुरूनगर येथील हेमंत बोंबले व आंबेठाण येथील मच्छिन्द्र दवणे यांच्या देखाव्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर गौरी सजावट स्पर्धेत साईनगर मेदनकरवाडी येथील वकील व खेड तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयाताई मोरे यांच्या ‘कोरोना योद्धा’ या देखाव्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेसाठी श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्था संचालित विद्यानिकेत इंग्लिश मिडीयम स्कुल व विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कुल आणि उद्योजक दत्तात्रय गवते संचालित समृद्धी सीएनजी पंप यांचे प्रयोजकत्व लाभले आहे.
स्पर्धकांनी शाडू मातीच्या मूर्ती, पर्यावरण, कोरोना योद्धा, ग्रामीण संस्कृती, वृक्षारोपण आदी विषयांवर इकोफ्रेंडली देखावे सादर केले होते.
# गणपती सजावट स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : १. हेमंत बाळासाहेब बोंबले, राजगुरूनगर
२. मच्छिन्द्र कोंडीबा दवणे, आंबेठाण
द्वितीय क्रमांक : १. सुस्मिता मधवे, राजगुरूनगर
२. गौरी पांडुरंग लाजूरकर, केळगाव
तृतीय क्रमांक : मोनिका संकेत केसवड
————-
# गौरी सजावट स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक : जयाताई बाळासाहेब मोरे, साईनगर, इंद्रप्रस्थ
द्वितीय क्रमांक : १. शिल्पा मंगेश जाधव , चाकण
२. सोनाली महादेव कराळे, वाफगाव, रा.नगर
तृतीय क्रमांक : १. गीता राहुल मोरे, सासवड
२. मीनाक्षी श्रीनिवास पोतदार, चिखली
वरील स्पर्धेसाठी एस. पी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उद्योजक शामराव देशमुख, सचिव रोहिणी देशमुख, दीपक शिंदे सर, समृद्धी सीएनजी पपंचे संचालक उद्योजक दत्तात्रय गवते व स्नेहल प्रसन्नकुमार देवकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.