खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर
खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक पदी निवड झाली. संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, संचालक दत्तात्रय सातपुते, आनंदराव काळे यांचे हस्ते चांभारे यांना नुकतेच संचालक निवडीचे पत्र देण्यात आले. चांभारे हे खेड तालुक्याचे डोंगराळ पश्चिम भागातील सुपे सातकरवाडी गावचे असल्याने त्यांच्या निवडीचे पश्चिम भागात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.