खेड बंद मात्र कारखाने चालू
खेड तालुक्यात सोमवार पासून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक निर्बंध,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना, मात्र वैद्यकीय सेवा, शासकीय कार्यालये, बँका व पतसंस्था चालू : प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
महाबुलेटिन नेटवर्क
राजगुरूनगर : सोमवारपासून पुढील आठ दिवस सकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लावण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली असल्याची माहिती खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
खेड तालुक्यात कोविड-१९ कोरोना विषाणू प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने याबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली , त्यास अनुसरून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज बैठक घेऊन खेड तालुक्यातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे सूचित केले आहे.
दिनांक ६ जुलै ते १३ जुलै दरम्यान सकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर कोरोना प्रतिबंध उपाययोजना म्हणून निर्बंध लावण्यासाठी पुढील अटींवर परवानगी देण्यात आली आहे.
# या कालावधीत शासनाने ठरवून दिलेल्या कोणत्याही अत्यावश्यक सेवा बंद राहणार नाही.
# औद्योगिक कारखाने, शासकीय कार्यालये, मेडिकल, दवाखाने, बँका व पतसंस्था सुरु राहतील
# कंटेनमेंट झोन वगळता उर्वरित भागातील सर्व कामगार व कर्मचारी यांना कामावर जाण्यास परवानगी आहे.
# किराणा, दूध, भाजीपाला सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील.